>

सिक्युरिटी अलर्ट: फसवणूकदार टीव्हीएस क्रेडिटच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. विशेष ऑफर पेजला भेट देऊन आमच्या सर्व विशेष ऑफर व्हेरिफाय करा. तुम्हाला कोणतेही खोटे कॉल आल्यास 1930 वर कॉल करून किंवा संचार साथी पोर्टल किंवा ॲपद्वारे त्वरित त्यांना रिपोर्ट करा

Hamburger Menu Icon
brands banner

आमचा ब्रँड जाणून घ्या

भव्यतेचा ध्यास घेणाऱ्या आणि सर्वोत्तम आयुष्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भारतीयांना पाठबळ देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.

Overview - TVS Credit
15+आकांक्षा बळकट करणारी वर्षे

आढावा

एक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणून, आम्ही भारतीयांना मोठे स्वप्न बघण्यास सक्षम बनवण्याचे आणि त्यांच्यासोबत जेथे आणि जेव्हा त्यांना आवश्यक असेल तेव्हा आमची फायनान्शियल प्रॉडक्ट्स प्रदान करून त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासह भागीदारी करण्याचे ध्येय ठेवतो. आमचा उद्देश भारतीयांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि फायनान्शियल समावेशनात प्रगती करण्यासाठी योगदान देणाऱ्या अनुरूप प्रॉडक्ट्ससह सक्षम बनवणे आहे.

प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाची पूर्ती करण्याच्या मिशन सह आमच्या प्रवासाला वर्ष 2010 मध्ये आरंभ झाला. विविध अडथळ्यांवर मात करीत आजवर अनेक यशाचे मापदंड गाठले आहे.

ब्रँड आयडेंटिटी

आकांक्षांच्या पूर्तीचे आमचे उद्दिष्ट आमच्या लोगोतून प्रतिबिंबित होते.

आमचे व्हिज्युअल नेमोनिक 'अस्पायरमार्क', उर्ध्व दिशेने उड्डाण चिन्हांकित करते. जे विकास आणि आशावाद यांचे प्रतीक आहे आणि एक ब्रँड म्हणून टीव्हीएस क्रेडिट द्वारे आपल्या कस्टमर्स साठी सर्व आकांक्षांच्या पूर्ती साठी स्वप्नांच्या उड्डाणांना चिन्हांकित करतो.

आमचा वर्डमार्क ठळक, आत्मविश्वासपूर्ण आहे आणि ज्यामधून आमची भविष्यातील दमदार वाटचाल प्रतीत होते.

आमच्या ब्रँड मध्ये निळा आणि हिरवा रंगाचा समावेश आहे. आमच्या पॅरेंट ग्रुपच्या आयडेंटिटी मधून निळा रंग प्राप्त असून त्याद्वारे स्वातंत्र्य, प्रेरणा, आत्मविश्वास आणि स्थैर्य सूचित होते. दुसऱ्या बाजूला, हिरव्या रंगातून विकास, सुसंवाद आणि नूतनीकरण सूचित होते.

ब्रँड जाहीरनामा

प्रत्येकाचा आयुष्यात प्रगतीचा ध्यास असतो आणि आपल्या प्रियजनांना सर्वोत्तम आयुष्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न असतो. परंतु विकासाची सिद्धता आणि आकांक्षांची पूर्ती नेहमीच सोपी नसते. कधीकधी कठीण किंवा अशक्यप्राय देखील वाटते.

आम्ही आमच्या कस्टमरला छोट्या-मोठ्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी कटिबद्ध आहोत. उज्ज्वल उद्याचा वेध घेताना आम्ही 'आज' सर्वोत्तम ठरावा यासाठी पायाभरणी करतो.

उत्कृष्ट सेवा आणि नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या पाठबळावर आम्ही खास निर्मिती केलेल्या फायनान्शियल प्रॉडक्ट्सच्या सहाय्याने संकल्पपूर्ती साठी कटिबद्ध आहोत. अद्वितीय संयोगामुळे कस्टमरच्या आकांक्षांना प्रेरणा मिळते आणि नवं ध्येय गाठण्यास सक्षम ठरतात.

जेव्हा आमचे कस्टमर विशिष्ट ध्येयासाठी प्रयत्नशील असतात, तेव्हा आम्ही स्थळ, काळ, वेळ यांचा विचार न करता त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी सहाय्य करतो. कस्टमरच्या पार्श्वभूमीचा विचार न करता आम्ही केवळ त्यांच्या स्वप्नांचा मागोवा घेतो. आम्हाला असे वाटते की, आजवर अनेक महत्वाकांक्षा दुर्लक्षित राहिल्या आहेत.

टीव्हीएस क्रेडिट. आसेतु हिमाचल, भारताचे सशक्तीकरण.

ब्रँड वॅल्यू

विश्वास

 सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता प्रदर्शित करणे ; सर्व वचनबद्धता पूर्णपणे सन्मानित करणे.

कस्टमरचा ध्यास

 एखाद्याच्या नमूद केलेल्या कर्तव्याच्या पलीकडे कस्टमर्सना आनंद देण्यासाठी एक मजबूत मानसिकता बाळगा ; सखोल माहिती, कस्टमर सूचना आणि सहानुभूतीसह कस्टमरच्या गरजा सक्रियपणे समजून घ्या आणि पूर्ण करा.

मूल्यवृद्धी

कस्टमर आणि इतर सर्व भागधारकांसाठी प्रत्येकवेळी आणि आम्ही जे काही करतो त्यासाठी सर्वोच्च मूल्य डिलिव्हर/तयार करण्याचे मार्ग सतत शोधणे.

अचूकता

विचार, कृती आणि संवादामध्ये तथ्य-आधारित, स्पष्टता आणि तीक्ष्णता - मूळ कारणांची ओळख पटवण्यासाठी सातत्याने आत्मपरीक्षण करणे, उपायांची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि हे सर्व सोप्या व स्पष्ट पद्धतीने व्यक्त करणे.

वेग आणि चपळता

स्वातंत्र्याने वेगाने पुढे जाण्यास तयार रहा ; कोणत्याही नोकरशाहीशिवाय प्रत्येक कृती वेगाने आणि कठोरपणे केली पाहिजे.

क्रांतिकारी मानसिकता

परंपरेच्या चौकटी मोडून विचार करा आणि सध्याच्या व्यवस्थेला आव्हान द्या. धाडस आणि दृढ निश्चयाने संधी निर्माण करा आणि त्यांचा उपयोग करा.

केअरिंग ब्रँड

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!