>
शेड्यूल्ड मेंटेनन्स: आमचे ॲप्लिकेशन्स 10 मे 2026 रोजी 03:00 AM ते 7:00 AM पर्यंत अपग्रेड केले जातील. या कालावधीदरम्यान अनेक सेवा तात्पुरती अनुपलब्ध असू शकतात. गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे.
Hamburger Menu Icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिटच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा आर्थिक वर्ष 24 मध्ये ₹ 25,900 कोटी पर्यंत विस्तार, आर्थिक वर्ष 23 पासून 26% वाढ

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 9 | मे | 2024

चेन्नई, मे 09, 2024: भारतातील अग्रगण्य एनबीएफसी पैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने 31 मार्च, 2024 रोजी संपलेली चौथी तिमाही आणि वर्षासाठी आर्थिक परिणाम प्रकाशित केले.

कंपनीने Q4 FY24 साठी एकूण उत्पन्न ₹1,519 कोटीचा अहवाल दिला, Q4 FY23 पासून 23% वाढ आणि Q4 FY24 साठी ₹148 कोटीच्या टॅक्स नंतर निव्वळ नफा, Q4 FY23 पासून 33% ची वाढ.

FY24 परफॉर्मन्स हायलाईट्स:

आर्थिक वर्ष 24 मध्ये एयूएम ₹ 25,900 कोटींवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 26% वाढ नोंदविली गेली.
आर्थिक वर्ष 24 मध्ये एकूण उत्पन्न ₹5,795 कोटी होते. आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 40% वाढ.
आर्थिक वर्ष 24 साठी टॅक्स पूर्वीचा नफा ₹762 कोटी असून आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 49% वाढ.
आर्थिक वर्ष 24 साठी टॅक्स नंतर निव्वळ नफा ₹572 कोटी. आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 47% वाढ.

आर्थिक वर्ष 24 दरम्यान, कंपनीने 43 लाखांपेक्षा जास्त नवीन कस्टमर्सचा समावेश केला. एकूण कस्टमर बेस 1.4 कोटी हून अधिक बनला आहे.
कंपनीने वितरणाच्या बाबतीत आर्थिक वर्ष 24 मध्ये सातत्याने प्रगती साधली आहे. क्रेडिट मागणी मधील वाढ, उपभोगातील विस्तार, वितरणाचा विस्तार यामुळे प्रगतीला चालना मिळाली. प्रॉडक्ट ऑफरिंग्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, कस्टमर अनुभवात वाढ, कामातील कार्यक्षमता यासाठी कंपनी सातत्याने कटिबद्ध आहे.

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह रजिस्टर्ड भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतात 46,500 पेक्षा जास्त टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेडसाठी एक फायनान्शियर आणि आघाडीच्या कंझ्युमर ड्युरेबल आणि मोबाईल फोन फायनान्शियर्सपैकी एक असल्याने, टीव्हीएस क्रेडिटमध्ये यूज्ड कार लोन्स, ट्रॅक्टर लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि अनसिक्युअर्ड लोन्समध्ये वेगाने वाढणारा फूटप्रिंट आहे. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने आजपर्यंत 1.4 कोटीपेक्षा जास्त आनंदी कस्टमर्सना सेवा दिली आहे.

मीडिया संपर्क: टीव्हीएस क्रेडिट

रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/marathi/


  • यावर शेअर करा
  • Share it on Facebook
  • Share it on Twitter
  • Share it on Linkedin

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!